मायेचा आहे डोंगर
मायेचा आहे डोंगर
1 min
189
बाप माझा मायेचा आहे डोंगर
केला उभा हा साम्राज्याचा सागर।।
बाप माझा कौटूंबीक वटवृक्ष
कुटुंबाला सांभाळण्या असे दक्ष।।
पाठी सदा उभे लेकरांच्या ठाई
मनस्ताप होतोय संसारा पाई।।
जगतांना सु:खेदु:खे पचवूनी
कष्ट अंगभर हा घाम गाळूनी।।
मुखावर नेहमी तेज हास्याचा
मला दिसते बाबा देव रूपाचा।।
मला लाभले बाबा इश्वरी पुन्य
आहे प्रेमळ नसेच कोणी अन्य।।
