मायबोली
मायबोली
1 min
182
शांत मृदगंध बीज
काव्य फुले मंदस्मीत
ज्ञानकुंभी मायबोली
दिव्यदृष्टी प्रज्वलीत
गाणे अभंग खजिना
वाहे अमृताचे झरे
रामायण महाभारत
गीता संघर्ष पाझरे
देशभक्ती पोवाड्यात
नव रत्नांची मजल
सप्तसुर प्रेमगीत
धूप सुगंधी गजल
तेवे वैविध्य संस्कृती
अष्ट दिशा प्रांजळीत
शब्दवीर तलवार
बीज क्रांतीची पेरीत
मायबोली रक्षणार्थ
चढे सार्थकी जीवन
पुर्णत्वाचा इतिहास
काव्यमृत ज्ञानाजंन
