मायबोली
मायबोली
1 min
441
साऱ्या जगात देखणी
सागराची विशाल खोली
जसा पौर्णिमेचा चंद्र
माझी मराठी मायबोली
तिच्या प्रत्येक शब्दात
वाहे अमृताचा झरा
जसा पहिल्या पावसात
सुटे मातीला गंध न्यारा
माझी मराठीच भाषा
साऱ्या जगाची माऊली
उन्हातल्या वासरांना
थंड गार ती सावली
कोकिळेचा गळा तिचा
तिची मृदू, गोड वाणी
वेगळाच वसा तिचा
आकाशाला गवसणी
