माय
माय
1 min
270
मायला मायेची गरज
दुधाला सायीची गरज
परतफेड नको म्हणती
आयुष्यभर आशीर्वाद देती
ना कसली अपेक्षा
पैसा भारी मायपेक्षा
सतत काळजी वाहती
संकट आमची झेलती
रागावली तरी प्रसन्न
घेतल नाही समजून
संस्कारांची भरली शिदोरी
भटकत बसली दारोदारी
माय म्हणजे ईश्वरिरुप
काळीज आम्ही तिचा हुरूप
