माय
माय
1 min
263
लेकीच्या माहेरासाठी
माय सासरी नांदते
सर्वांना समजून घेते
मन मारून जगते
लेकीच्या सुखासाठी
माय सहनशील होते//१//
सासू, सासरे जरी बोलले
हसून सारे निभावून नेते
नवर्याच्या सतत सेवेत राहते
प्रसंगी बोलणी पण खाते
लेकीच्या माहेरासाठी
माय सासरी नांदते//२//
दुखले खुपले सर्व सांभाळते
आयुष्यातील चढउतार
गमतीत घेते
जीवनमान उंचावण्याचा
प्रयत्न मात्र सतत करते
सर्वांना उत्तम साथ देते
लेकीच्या माहेरासाठी
माय सासरी नांदते//३//