STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

4  

Tukaram Biradar

Others

माय नारळाचं पाणी

माय नारळाचं पाणी

1 min
948

ऐका-ऐका दोस्तानों, माय बापाची कहाणी

बाप नारळी खोबरं, माय नारळाचं पाणी

बाप कष्ट करी माझा,

करी रानं हिरवंगार माय हरिण काळीज,

पिके जपती या फार

बाप शिवाराचा धनी, माय धन्याचीये राणी

माय नारळाचं पाणी..... 

एकदा माय- बापामधी ,पैज अशी होती लागली

सांग कुणावाणी पोरंं, आहे कुुुणाची सावली

तेेेेेव्हा हसूून माय म्हणी, थोडा थोडा दोघावानी

मााय नारळाचं पाणी...... 

जीव लावली या माय, मन मायचं निराळं

बाप लपवीतो डोळा, जवा येतो याव काळ

ओला मायेचा पदर, पुुुुसून डोळ्यामधील पाणी

माय नारळाचं पाणी.......


साहित्याला गुण द्या
लॉग इन