माय मराठी
माय मराठी
मातृभाषा माझी मराठी
मला आहे तिचा अभिमान
अलंकारांनी नटलेली अशी
आहे महाराष्ट्राची शान....
थोरवी मराठी भाषेची
किती किती वर्णावी
अवीट गोडी त्याची
प्रत्येकानेच अनुभवावी...
साऱ्या विश्वात गाजते
माझ्या मराठीची शान
दिव्य तेज ही मराठी
नव साहित्याची खाण...
ओव्या,अभंग, पोवाड्यांना
साज चढवला मराठीने
छत्रपती शिवाजींच्या आणि संभाजीच्या गाथा
लोक गातात अभिमानाने.....
तलवारीची धार मराठी
चपलख प्रहार मराठी
माधुर्याची माया मराठी
नव रसांचा श्रृंगार मराठी ...
कुसुमाग्रजांचा जन्मदिवस
असे मराठी भाषा दिनाची शान
स्वर- व्यंजनाने नटलेल्या
मराठीचा मला आहे अभिमान.....
