Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Mrudula Raje

Others

3  

Mrudula Raje

Others

माय - मराठी

माय - मराठी

1 min
278


ज्ञानोबांची, तुकयाची, माय मराठी गोमटी |

'श्री'काराने सजतसे मराठीची अक्षरपाटी ||



संस्कृत हिची माता थोर, प्राकृताचे रम्य रूप |

'अमृतातें पैजा जिंके' माझी मराठी भाषा-भूप ||



मुक्ताईच्या, जनाईच्या, ओव्या ओठांवर खेळे |

होनाजीचा भूपाळीने, जागती मराठी बाळे ||



गाते शिवबाचा पोवाडा, जन्म देई अभंगाला |

लावणीच्या शृंगारात सजविते नवरसाला ||



'वाघिणीचे दूध' प्याली, भक्तीच्या ही रंगे न्हाली |

काव्य-शास्त्र-विनोदाची, हिला झळाळी लाभली ||



टिळकांचे अग्रलेख, इंग्रजांना नमविती |

अत्र्यांचा 'मराठा' करी, उरीं घाव घणाघाती ||



खांडेकर, आणि विंदा, 'ज्ञानपीठ' आणती घरा |

नभांगणी झळकतो, कुसुमाग्रजांचा दिव्य तारा ||



पु. ल. लावतात वेड, मराठी मनामनाला |

तेंडुलकर नाट्यरंगी, रंगवती सर्व जगाला ||



कधी कोंकणी, वऱ्हाडी; कधी डांगी, अहिराणी |

बोली भाषा मराठीच्या, सुवर्णाची अस्सल नाणी ||



अशी माझी माय मराठी, जिवा लावीतसे छंद |

दरवळो आसमंती, हिच्या कीर्तीचा सुगंध ||


Rate this content
Log in