माय मराठी
माय मराठी
1 min
166
माय मराठी ही माझी
तिचा बाळ मी तान्हा
माझा पिंड रे पोसला
पिऊनी शब्दरूपी पान्हा
माझ्या मायेचे असेरे
रूप अती मनोहर
खुळविती रूप तीचे
मात्रा, वेलांटीचे अलंकार
थोर लेखक, साधू संत
इथे निर्मिती साहित्य
नवोदित इथे तिची
सेवा करतात नित्य
पसरली लेकरे तिची
दाही दिशांना चौफेर
माय मराठीचा झेंडा
नेला तयांनी अटकेपार
अशी थोर माय माझी
काय वर्णू तिची शान
माझ्या मराठी बोलीचा
मज वाटतसे अभिमान
