STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

माय मराठी

माय मराठी

1 min
1.0K

अक्षर अक्षर गुंफून

शब्दमाला सजली

शब्दमाला गुंफून

वाक्य रचना बनली....


शब्दभांडार जमले

मना देई आनंद

कविता तयार झाली

बनू लागला अभंग.....


मराठी भाषेचे सौंदर्य

सजले कोंदणात आज

अलंकारिक शब्दांचा

चढवला सुरेख साज.....


कर्मभाषा माझी ही

मातृभाषा मराठी माझी

कर्मभूमी माझी ही

राजभाषा ही माझी.....


मायभूमी मराठी माझी

शूरवीर थोर शिवबांची

संतांची ही पुण्यभूमी

जाणकार आहे सुसंस्कारांची...


भक्तीचे गायीले इथे गीत

या मराठी मायबोलीने

भाषेची आहे शान ही

जपला वारसा संस्कृतीने......


साधी सोपी झोकदार

मराठी भाषा फार लयदार

गुणगान गावे किती तिचे

इथला मानव इमानदार....


Rate this content
Log in