Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Kiran Ghatge

Others

3  

Kiran Ghatge

Others

माय माझी

माय माझी

1 min
11.4K


ए माय, बघ बाय 

तू गेली सोडून आम्हा 

तुटला मायेचा पान्हा ! 


जन्म हा आता सुना 

तुझवीण जगू कसा 

हृदयी तुझ्याच खुणा !


गेलीस तू अशी निघून 

सोडून अर्धा डाव 

भरले नाही अजून घाव !


नाही कानी तुझी हाक 

आठवण तुझी होता 

व्याकुळ मन हकनाक !


बोट धरुनी माझे 

केले समृद्ध जीवन सारे 

वाहिले संसाराचे ओझे !


बनून एक धागा 

मायेच्या या गुच्छाचा 

पावलो पावली मी जागा !


तुझवीण मी नाही बरा 

अपूर्ण हा जीवनमळा

पदर मायेचा फाटला जरा !


आठवते तू अंधुक मला 

धावपळीत असे जरा 

डोळ्याच्या कडाहि ओल्या !


शिकवण असे तुझी 

सेवा असो सर्वांची 

अपेक्षा फळांची खुजी !


मायेची शिदोरी ही 

मज लाख मोलाची 

असे जीवनात या


Rate this content
Log in