Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Supriya Devkar

Others

3  

Supriya Devkar

Others

माय माझी

माय माझी

1 min
213


उमलल्या फूलावानी बहरली माय माझी 

निखळ मनानं उचलली तीने संसाराची वजी॥१॥


गाभूळल्या चिंचेवानी कधी अंबट कधी गोड 

मायेच्या विचारांना नाही कशाचीच तोड ॥२॥


आई लेकराच नातं जशी दूधावर साय 

वात्सल्यानं हंबरते जशी गोठ्यात गाय॥३॥


पिकलेल्या केसामंधी वाहे तरूणाईचा झरा

आईच्या प्रेमाचा तर पाहुणचारच न्यारा ॥४॥


नाती जपता जपता शिकवे आयुष्य गाणे

संसाराची विन शिवता एकतेची ओवी म्हणे॥५॥


माय माझी भुकेली तिला प्रेमाचीच आस

लेकराच्या सुखामध्ये खायी पोटभर घास॥६॥


डोळे पाणवती तिचे लेक सासरी निघता

आनंदून जात असे सुखी गोकुळ बघता॥७॥


समाधानाने जगते विसरून दुःखाचे क्षण 

पिल्लांमध्ये रमविते तिचे करपलेले मन॥८॥


साथ सुखी संसाराची दिली हसता हसता 

बाबा ताट उभा जिद्दीने तिला बघता बघता ॥९॥


माये तुझी शिकवण आधार देई जगण्याला 

पाय रोऊन मातीमध्ये शिकविले उभा राहण्याला॥१०॥


Rate this content
Log in