STORYMIRROR

Kirti Borkar

Others

3  

Kirti Borkar

Others

माय लेकी

माय लेकी

1 min
12.2K

लाडाची माझी गुणाची, लहान आहे आई

तिच्याविना कुठे माझं, मन रमत नाही


एकेक प्रश्न वाढतो, मनात रे माझ्या

काळजी होत असते, अभ्यासाची तिच्या


तिच्यापासून लांब, एकटी कशी राहू

तिच्यात श्वास माझा, तीच माझी माऊ


आठवणीत तिला, माझ्याजवळ घेते रोज

तिच्यासाठी स्वप्नात, करते नवी खोज


तिच्यासाठी आई, मी धडपडत असते

संस्काराची शिकवण हळूच देत असते


चिमुकलीला जाईन म्हणतो, भेटायला उद्या

काय करत असेल, माऊ माझी सध्या


जातांना तिच्यासाठी,बनवून नेणार काही

तिच्यामाझ्या गप्पा, कधी संपणार नाही


जवळ घेऊन तिला, झोपवणार कुशीत

तिला बघून नेहमी, असते रोज खुशीत


तिचे माझे नाते, कुणी समजणार नाही

मी तिच्यासाठी काय, हे तिलाच कळते आई..!!


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్