माऊली
माऊली
1 min
318
माय माऊली आई माझी
करूणा दयेचा सागर ती
स्वतः उपाशी राहून ती
घास मायेचा भरवते ती ।।1।।
माय माझी आई ती
क्रुपेची साऊली ती
कष्ट सोसुनी पिल्लांना
गगन भरारी घेण्यास पाठबळ देते ती ।।2।।
आई आहे ममतेचा
पाझर प्रेमाचे प्रतिक ती
अनंत यातना गर्भात सोसुन
दावीली तीने तुम्हास दुनिया ती ।।3।।
