STORYMIRROR

शिल्पा म. वाघमारे

Others

4  

शिल्पा म. वाघमारे

Others

मातोश्री जिजाऊ

मातोश्री जिजाऊ

1 min
697

वीरकन्या म्हाळसा नि

पराक्रमी लखुजींची

स्वयंसिद्ध संस्कारी ती

दिप्ती तेजस ज्ञानाची...||१||


प्रतिभासंपन्न जिजा

वीरा निपुण रणीची

राजमाता शिस्तप्रिय 

माय मृदुला शिवाची...||२||


पर्व दैदिप्यमानच 

नवयुग ते निर्मिले

मढवले संस्कारांनी

शिवबास घडवले...||३||


नवे पान महाराष्ट्र

सोन्यापरी चमकले

गुलामीच्या पाशांतून

मराठीस सोडवले...||४||


स्वाभिमानी स्वप्न तुम्ही

स्वराज्याचे साकारले

स्त्रीशक्तीचे रुप खरे 

जगतास दावियले...||५||



Rate this content
Log in