माते
माते
1 min
374
घेऊनी टाक शस्त्र हातात
सोडून टाक ब्रह्मास्त्र त्याच्यात
दुर्गा,चंडिका बरीच रूपे
नाना विविध एक स्वरूपे
जगतजननी माय आम्हा सर्वांची
पेलतीस तू जबाबदारी रक्षणाची
नऊ दिवस ऊर्जेचा आम्हास
समईचा प्रकाश पळवे अंधारास
दर्शनासाठी तुझ्या व्याकूळ जीव
तुझ्या भेटिवीना सारे निर्जीव
कृपादृष्टी अशीच आम्हास मिळो
होऊनी कृपा अहंकार पळो
