STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

मानवतेची साखळी

मानवतेची साखळी

1 min
245

पीडितांना साहाय्य करून

जोडू मानवतेची साखळी

खूप दिले नाही तरी देऊ

फुल ना फुलांची पाकळी


जराशीही आपली मदत

इतरांचे आयुष्य फुलवते

दानाने मिळते समाधान

चेहऱ्यावर हास्य खुलवते


या कोरोनाच्या महामारीने

कर्ते सवरते मृत्युमुखी पडले

कोणी वालीच नाही उरला

कुंटुंबाचे आधारच हरवले


पुन्हा यांचे जीवन उभारू

एक साखळी निर्माण करू

प्रत्येकाने केली थोडी मदत

माणुसकीचा चला सागर भरू


Rate this content
Log in