STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

मानवी बाग

मानवी बाग

1 min
238

मानवी जीवन हे एका बागेसारखे आहे

बागेतल्या रंगीबेरंगी फुलांसारखे आहे

बाग रंगीबेरंगी फुलांनी सजून दिसते

लहान मुले असली की घर गोकुळ भासते

बागवान आपल्या बागेची काळजी घेतो

घरातल्या प्रत्येकाला वडील संरक्षण देतो

फुलपाखरू प्रत्येक फुलांशी संवाद करतात

आई आपल्या मुलांचे हवे नको ते पाहतात

जेवढी बाग सुंदर तेवढं लोकं पाहतात

कुटुंबातल्या प्रेमाची लोकं स्तुती करतात

बागेतील फुल सुकून गळणार आहे

जन्मलेला प्रत्येक जीव मरणार आहे

फुल सुकण्यापूर्वी त्याची मजा घ्यावे

प्रत्येक क्षणाचा पुरेपूर आनंद घ्यावे


Rate this content
Log in