मान्सूनचा पाऊस
मान्सूनचा पाऊस
1 min
200
खूप झाली प्रतीक्षा आता
अजून वाट तू लावू नको
कंटाळली सर्वच जनता
आता वेळ तू लावू नको
रोहिणी गेली न बरसता
आता कळ तू पाहू नको
पाण्याचा ठणठणाट सर्वत्र
आता जाळ तू लावू नको
बळीराजा सज्ज आहे पेरण्या
सत्त्वपरीक्षा तू पाहू नको
शेतात पिकेल तर माणूस जगेल
तशी वेळ तू कोणावर आणू नको
साऱ्यांचे मागणे एकच आहे
बरस जोरात तू मागे पाहू नको
ओलेचिंब करून टाक साऱ्यांना
छत्री उघडण्यास वेळ देऊ नको
