माणूस
माणूस
1 min
27.4K
स्वतःसाठी कधी
जगतो माणूस
चिल्यापिल्यांसाठी घरटे
बांधतो माणूस
घरट्याला उब
देतो माणूस
दुष्ट कालचक्रात
भरडतो माणूस
स्वार्थासाठी नाते
विसरतो माणूस
रक्ताचे ऋणानुबंध
तोडतो माणूस
नेहमीच माणुसकीला
विसरतो माणूस
पशुसारखा कधीकधी
वागतो माणूस
मी आणि माझ
जपतो माणूस
शेवटी मात्र एकटा
उरतो माणूस
