Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

माणूस

माणूस

1 min
173


माणूस म्हणून जन्म मिळाला

मानवा समजून घे एकमेकाला||धृ.||


स्वतःचे भविष्य स्वतः घडव 

मनाची किवाडं उघडी कर

जगणं सुखकर होण्यासाठी

सत्याचीच मानवा कास धर ||१||


ज्ञानामृत घे अन दे सकला

सज्ज राहा कर्तव्य करायला

आनंदाने दुःखाला सामोरे जा

समजून घे नात्यांच्या बाजाराला ||२||


अंतरातले काहूर शब्दात उतरव

नयनातील भाषा लपत नसते

ह्रदयी वसते ते ओठी येते बरं

मन मायेकडे रिते करायचे असते ||३||


मानवा चांगलेच कर्म नित्य कर

चार जीवस्यकंठस्य मित्र जपून ठेव

सुखदुःखात येतील ते मदतीला

अती दोस्तांचे माजवू नको तू पेव||४||


भूतकाळातले घडले ते घडून गेले

भविष्यकाळाचा विचार नकोस करू

जगून घे याच वर्तमानकाळात जीवन

स्मरणाच्या परसात गोल फेर धरू||५||


Rate this content
Log in