STORYMIRROR

VINAYAK PATIL

Others

4  

VINAYAK PATIL

Others

माणूस

माणूस

1 min
537

माणूस कुठे मिळतो 

बाजारी की दुकानात 

आज हरवे माणूस 

ऑनलाइन जगात ||१|| 


माणसाच्या हितासाठी 

कित्येकजण झटले 

माणसातील माणसा 

शहाणपण न आले ||२|| 


बुद्ध, महावीर ठेवी 

जगती नित्याचा पाठ 

तरीही माणूस धरे

चुकीच्या मार्गाची वाट ||३|| 


माणसाच्या या गर्दित 

माणूस हरविलेला 

कसा शोधू या जगती

कशा भान न ठेविला ||४|| 


Rate this content
Log in