माणूस म्हणून जगतांना
माणूस म्हणून जगतांना
माणूस म्हणून जगताना,
थोडा विचार करून तर बघा,
दुसर्यांच्या चुका दाखविण्याआधी,
स्वतःच्या चुका निरखून तर बघा.
कोणावरही रागविण्याआधी त्या व्यक्तिला
नीटपणे समजावून तर बघा.
माणूस म्हणून जगताना
हा विचार करून तर बघा.
देण्यासारखे खूप काही आहे तुमच्याजवळ,
कधी तरी दुसर्यांना आनंद देऊन तर बघा.
करण्यासारखे खूप काही आहे तुमच्याजवळ,
कधीतरी दुसर्यांना मदत करून तर बघा.
जमले तर त्यांच्या सुखदुःखात,
सामील होऊन तर बघा.
माणूस म्हणून जगताना
हा विचार करून तर बघा.
एखाद्यावर जीवापलिकडे,
प्रेम करून तर बघा.
निस्वार्थ मनाने जगून तर बघा.
परमेशराने निर्माण केलेल्या सॄष्टीत,
माणूसकी निर्माण करून तर बघा.
माणूस म्हणून जगताना
हा विचार करून तर बघा.
जीवनातले आनंदाचे क्षंण,
पुन्हा अनुभवून तर बघा
.
