STORYMIRROR

Nita Meshram

Others

4  

Nita Meshram

Others

माणुसकीला जप माणसा

माणुसकीला जप माणसा

1 min
433

माणुसकीला जप माणसा।

माणुसकीला जप।

माणुसकीची गुढी उभारू

प्रेमभावना जप।

जाळ तुझ्या या मनद्वेषाला

विषारी भाव अन् लोभाला

विसर कंटक स्वार्थाला।

माणुसकीला जप माणसा

माणुसकीला जप

गुढी उभारू एकतेची

भेदाभेद संपविणारी

जगण्याचे गुढ उकलणारी।

माणुसकीला जप माणसा ।

माणुसकीला जप।      


साहित्याला गुण द्या
लॉग इन