माणुसकीच्या जाणिवेची गुढी...
माणुसकीच्या जाणिवेची गुढी...
करुन स्वच्छता हर एक दूषित मनामनाची
स्वागत एकजुटीने नववर्षाचे आनंदात करू...
विषमतेचे विसरुन सर्व भेदाभेदी रुसवे, फुगवे
अभेद्य समानतेच्या माणुसकीची गुढी उभारू...
जात, पात, धर्माची करुन बंद अपमानी दारे
माणसास जपण्याची विवेकी कास धरू...
संविधानाच्या कर्तव्य मूल्यांची राखून लाज
सगळे विश्वासाने एकतेसाठी निरंतर झुरू...
सौहार्दाने परोपकाराचे ठेऊन सदैव भान
एक दुसऱ्याच्या भावभावनात वाटेकरी होऊ...
अंधश्रद्धेस झुगारुन वैचारिकता हृदयी जपून
समतेच्या कल्याणात जीवन झोकून देऊ...
चला एकजूट होऊन आपत्तींशी लढण्याचा
अभिमानाने आरोग्यरूपी संकल्प आज करू...
आशा नवचैतन्याची बाळगून संदेश देते आज
सगळे वाईट राक्षस बाहेर काढून गुढी हाती धरू...
