STORYMIRROR

Varsha Kendre

Others

3  

Varsha Kendre

Others

माणुसकीची गुढी उभारू

माणुसकीची गुढी उभारू

1 min
150

 प्राणीमात्रांवर दया

 दीनदुबळ्यांना आधार

 भुकेल्यांना अन्न

 यात माणुसकीचा सार


 नको मनात द्वेष मत्सर

 मदतीस धावू सत्वर

 प्रेम बंधुभाव जोपासून

 परोपकारी वृत्तीत राहू तत्पर


 अनाथांना करून मदत

 वृद्धांसाठी सेवाभाव

 देव यातच जाणुन

 अंगी बाळगू सद्भाव


 संत वचन घ्यावे जाणून

 विचार प्रामाणिक ठेवून

 माणुसकीची गुढी उभारू

 मंगल तोरणे दारी बांधून


साहित्याला गुण द्या
लॉग इन