माणुसकी समजून घेऊ या...
माणुसकी समजून घेऊ या...
1 min
344
आज जणू विसरलाय माणूस माणसाला
संपलीच आहे सगळी निःस्वार्थाची योग्यता...
नको त्या विचारांतून ढासळतोय समतोल
हव्यासापायी माजलीये निष्ठुर वाच्यता...
विचारात भिन्नता, स्वभावात वेगळेपणा
असा जरी असला गोंधळ विषमतेचा...
एकमेकांना समजुतीने समजून घेऊया
वागण्या-बोलण्यातून संदेश माणुसकीचा...
सर्वधर्मसमभावाची आठवावी शिकवण
विश्वासाची जपावी समतेची अमोल ठेव...
हक्कांसोबत अधिकारांची धरावी पताका
बदलास भविष्यात फुटेल वैचारिक पेव...
