माणसं भूत बनतात
माणसं भूत बनतात
1 min
177
इथं दाट काळोख पडला की,
माणसं भूत बनतात.....
इथं आपल्याच माणसाचे स्पर्श
घायाळ करतात....
इथं भोजन करतात मांसांच
इथं पाणी पितात रक्ताचं
इथं डोके फुटतात माणुसकीवर
इथं स्टोव्हचा होतो भडका...
अन् जिवानीशी जाते अबला...
इथं जळतात बिन लाकडाची प्रेते गरीबांची..
आणि इथे म्हणतात..
आनंदी आनंद गडे...
जिकडे तिकडे चोहीकडे...
