माणसातला देव
माणसातला देव


माणूस शोधत होता देवाला
पाहू लागला मूर्तीला म्हणून घडवू लागला दगडाला
पण आजपर्यंत सापडला नाही कोणाला.
मानव्हे करत होता त्याची उपासना
मग का बेकार झाली मानवाची वासना
काहींचा तर गर्दीमध्ये चिरडून मोडला कणा.
मानव घालू लागला दुधाचा अभिषेक
मग आजही का मारतो आपण शेषनागाला
खरंच स्वार्थी मानवाला निसर्ग देवाने दिलेल्या शिक्षेचेही वाटत नव्हते विशेष.
कलयुगीन मानव विसरला संस्कृतीला
का मारले धूर्त मानसा देवरूपी गजाला
म्हणूनच भेटू लागली शिक्षा आपल्या कर्माला.
मानव देवाच्या शोधात धाव धाव धावला
अखेरीस सापडला देव मानसातला
खरच त्याकडे शक्ती आहे रोखण्याची संकटांला