STORYMIRROR

Savita Kale

Others

4  

Savita Kale

Others

माणसातला देव

माणसातला देव

1 min
945

'डॉक्टर' या नावाचा

जप नाही केला कधी

धावून आला माझ्यासाठी

सर्वात तोच आधी


जात होतो दर्शनाला

रोज मंदिरात मी

माणसात पाहिला

आज माझा देव मी


कैक असहाय्य जीवाला

नवसंजीवनी दिली

संकटाच्या काळात

साथ त्याने दिली


मृत्युच्या दाढेतून

वाचवी प्राण तो

माझ्यासाठी माझा

माणसातला देव तो


साहित्याला गुण द्या
लॉग इन