माणसाची वृत्ती
माणसाची वृत्ती
1 min
295
फुकट काही दिल्यानंतर
त्याचे महत्व राहत नाही
आजकाल लोकं फुकटचे
काही घेत देखील नाही
आयत्या बिळात बसे नागोबा
असे काही लोकं राहतात
दुसऱ्याच्या जागेवर बसून
आपली मालकी दाखवितात
कष्टाची नसते यांना किंमत
हे असतात आयते खादाड
ज्यांच्याकडून खायला मिळाले
त्यांच्याकडून बोलतात फाडफाड
दे रे हरी पलंगावरीची वृत्ती
माणसाला आळशी बनविते
एक पैसा कमावण्याची वृत्ती
काम करणाऱ्याला जग जिंकून देते
