STORYMIRROR

Priyanka Shinde Jagtap

Others

4  

Priyanka Shinde Jagtap

Others

माखलेले हात

माखलेले हात

1 min
142

प्राॅम्प्ट ५

०५/०५/२०१९


शीर्षक - माखलेले हात


माणुसकीची आहे एकच जात,

नका रंगवू कुणी रक्ताने हे हात ॥१॥


दाही बोटे जरी नसतील समान,

मुठीत होता बंद होतील बलवान ॥२॥


आपल्याच नात्यांशी कशाला वैरी?

मिटवून टाका कायमची ही दरी ॥३॥


दंगली, जाळपोळ, कटकारस्थाने,

प्रदुषित करतात सामाजिक साधने ॥४॥


माखलेल्या हातांपेक्षा श्रेष्ठतम दान,

देण्यानेच वाढतो दात्याचा सन्मान ॥५॥


घातक प्रथांच्या वाट्याला जाणे टाळा,

आधुनिकतेच्या नियमांना मात्र पाळा ॥६॥


काय घेऊन आलो, काय घेऊन जायचे?

कधी ना कधीतरी मातीतच मिसळायचे ॥७॥


प्रेमाने जिंकण्यासाठी आधी मनाला जिंका,

बसू देऊ नका कधी सूडभावनेचा ठपका ॥८॥


एकीच्या या बळामध्ये आहे शोभा बोटांची,

नको ते युद्ध, गरज आहे शांती-सलोख्याची ॥९॥


Rate this content
Log in