माझ्या ह्रदयात तू....
माझ्या ह्रदयात तू....
माझ्या ह्रदयात तू...
माझ्या ह्रदयात तू....
शरीराच्या प्रत्येक कणात तू....
आत्म्याच्या प्रत्येक ध्यानात तू....
माझ्या जीवनात तू....
माझ्या स्पंदनात तू....
माझ्या मनात तू.....
माझ्या कवितेतील प्रत्येक शब्दांत तू...
माझ्या भावना तू...
माझ्या जाणीवा तू....
आणि माझ्या संवेदनाही तू.....
माझ्या ह्रदयात तुझाच वास असतो....
तुझ्या आवाजाचा मला नेहमीच ध्यास असतो....
माझ्या ह्रदयात तुझेच स्वर असतात....
स्पंदनातून ते हलकेच तरळतात.....
तुझ्या असण्याने मी मोहरुन येते....
तुझ्या सोबतीने मी सुखावते....
जगण्यातील तुझ्या जिंदादिलीने
तुझ्या सोबत जगावेसे वाटते...
तुझा स्पर्शगंध मोहून टाकतो
नवचैतन्याचा बहर आणतो
सकारात्मकतेचे बीज ह्रदयात रुजवून
संकटातही हसण्याचे सामर्थ मला देऊन जातो....
संकटातही हसण्याचे सामर्थ्य मला देऊन जातो....
