माझ्या ग्रामीण भूमीत
माझ्या ग्रामीण भूमीत
1 min
364
माझ्या ग्रामीण भूमीत
सोन्या चांदीच्या रे खाणी
तांबड्या रेताड मातीला
वास चंदनाच्या वाणी
माझ्या ग्रामीण भूमीत
हिरवी - हिरवी गार झाडी
स्वर्गाचा भास जणू
ओलांडता वाट नागमोडी
माझ्या ग्रामीण भूमीचा
थाट आहे रे वेगळा
अमृताच्या मळ्यातून
निघे मोत्याचा जोंधळा
माझ्या ग्रामीण भूमीचा
माणूस अगदी करारी
त्याच्या ग्रामीण बोलीला
आहे न्यारीच खुमारी
माझ्या ग्रामीण भूमीची
पुरवावी किती लाडी
चाखता केव्हाच संपेना
हिची अवीट ती गोडी
