माझ्या आईचा सहवास....
माझ्या आईचा सहवास....
1 min
188
माझ्या आईचा सहवास
जसे आभाळाचे सुख
मायेची तिची छाया
तिची साथ स्वर्गस्वरुप
तिने मायेचा भरवुनी घास
केले मज लहानाचे मोठे
अड्खळले पाऊल जेव्हा
हात तिचे सावरायास होते
आईचे रुप तेजस्वी
जसे देव भेटले पुढ्यात
तिच्या चरणात लाभले
मज ब्रम्हांड सारे साक्षात....
