माझं शिवार
माझं शिवार


नदी किनारी बांधावरचं रान||
भरल्या कणसाची ज्वारी|
टिपूर मोत्या वाणी दिसे दाणे||
दिसे भासे मज हिरवं शिवार सोणेरी|
चिवचिवाट घिरट्या घेत राही पाखरं||
डोंगर माथ्या पलिकडे माझं शिवार...(१)
माळ रानी गाते गोड गाणं|
होते मंजुळ कोकीळेचे गित छान||
मन झऱ्या सारखं आटत गेलं|
गर्द मोहरी सारखं दाटत गेलं||
माळ रांन माझं जीवाचा आधार|
डोंगर माथ्या पलिकडे माझं शिवार...(२)
सकाळच्या पहारी आलो नदीच्या किनारी|
झुळझुळत्या पाण्याने मझ आनंद उभारी||
सुळसुळता थंड वारा झोंबला मला|
ऊन कोवळे उब मिळे अंगाला||
दिसे पार वाट दुरवर|
डोंगर माथ्या पलिकडे माझं शिवार...(३)
गाय रांनी चरती मोकाट|
येतो शेळी मेंढीचा कळप सुसाट||
वास मातीचा ओलावा लागे तिचा जिव्हाळा|
क्षणात भासे माझे शिवार नंदनवन||
माझ्या जीवनाचा आकार अगणित सार|
डोंगर माथ्या पलिकडे माझं शिवार...(४)