STORYMIRROR

Jyoti gosavi

Others

3  

Jyoti gosavi

Others

माझं सासर

माझं सासर

1 min
393

सासरच्या वाट

 कुचकुच काट

निजायला घोंगडी

 दारी गाय लंगडी

 खायला शिळी भाकर

 चहाला नाही साखर

 कुत्र्याला म्हणावं लागतं

 अहो अहो हाडा

 बाजूला व्हा घालते सडा

 भिजल तुमची शेपटी

 नणंद माझी कपटी

नंणंदेच कार्ट 

करत किरकिर

 भाऊजींना आमच्या

 आलय फेफर

जाऊ बाई च्या 

नाकात काटा

 पाठी लागली

 घेऊन सोटा

 मामंजी आमचे

 घालतात पगडी

 पुण्याला जाऊन

 आणतात लुगडी

 सासूबाईंना चोरून

 खाल्ला रोडगा

 पाठीत माझ्या

 बसला बडगा

 असं माझं द्वाड सासर

 कोणाला ना मिळावं  

   मिळाल तरी सये

  अश्रूसंगे गिळाव


Rate this content
Log in