STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Others

4  

Sanjay Raghunath Sonawane

Others

माझी शाळा

माझी शाळा

1 min
27.1K


माझी गोजिरवाणी शाळा

मज लाविते रे लळा

माझी कनवाळु माउली

माझी जीवन साउली

वसली निसर्गाच्या कुशीत

भारत मातेच्या हृदयात

रोज, रोज लाविती ओढ़

माझी शिक्षणास धडपड


कौशल्याचे माहेर घर

ममता, समतेचे भांडार

मुलामुलीना खुले दार

घ्या अगाध शिक्षण भरपूर

असू दे प्रेम तुझ्या मनी बाळा

शिक्षण वाहिनी आपली शाळा

माझी गोजिरवाणी शाळा

मज लाविते रे लळा .


संयम आणि शिस्त

सदा रहावे व्यायाम, अभ्यासात व्यस्त

शिकून शहाणा हो रे बाळा

मायबापांचा लई जिव्हाळा

राख ईमान आपल्या मातीचे

जीवनदाई धरित्रीचे

माझी गोजिरवाणी शाळा

मज लाविते रे लळा .


सर्व धर्म समभाव शिकवण

राष्ट्रभक्ती ,बंधुभाव हे मूल्य शिक्षण

दिला आदर्श तू घालून

आमची शाळा खूप छान

स्वास्थ्य, सुंदर रमते मन

माझी गोजिरवाणी शाळा

मज लाविते रे लळा.

वसली निसर्गाच्या कुशीत

भारत मातेच्या हृदयात

रोज, रोज लाविती ओढ़

माझी शिक्षणास धडपड


कौशल्याचे माहेर घर

ममता, समतेचे भांडार

मुलामुलीना खुले दार

घ्या अगाध शिक्षण भरपूर

असू दे प्रेम तुझ्या मनी बाळा

शिक्षण वाहिनी आपली शाळा

माझी गोजिरवाणी शाळा

मज लाविते रे लळा .


संयम आणि शिस्त

सदा रहावे व्यायाम, अभ्यासात व्यस्त

शिकून शहाणा हो रे बाळा

मायबापांचा लई जिव्हाळा

राख ईमान आपल्या मातीचे

जीवनदाई धरित्रीचे

माझी गोजिरवाणी शाळा

मज लाविते रे लळा .


सर्व धर्म समभाव शिकवण

राष्ट्रभक्ती ,बंधुभाव हे मूल्य शिक्षण

दिला आदर्श तू घालून

आमची शाळा खूप छान

स्वास्थ्य, सुंदर रमते मन

माझी गोजिरवाणी शाळा

मज लाविते रे लळा.


Rate this content
Log in