माझी सावली
माझी सावली
लुटूपुटूच्या खेळण्यातली ती माझी बाहुली होती
कधी मी तर कधी ती माझी सावली होती
गोल तिचे गाल, तर भारी तिची चाल
गालगुचे घेतल्यावर होई लाल लाल
स्कूलमध्ये तिचा नेहमीच पहिला नंबर
मग खायची तिची होत असे चंगळ
मोठी कधी होत गेली हे कळलेच नाही मला
कामामुळे म्हणावा तसा वेळ देता आला नाही मला
कधी कधी चिडायची ती खूप माझ्यावर
मग राग तिचा जायचा मी चॉकलेट दिल्यावर
आमच्या दोघांच्या भांडणात तिच एक दुवा असते
आई बनून माझी ती मग, मलाच समजावत असते
हरवलेलं बालपण नक्कीच देईन तुला
पण कधी कधी तू पण समजून घेत जा मला
