STORYMIRROR

Sunayana Borude

Others

4  

Sunayana Borude

Others

माझी परी..माझी कन्या

माझी परी..माझी कन्या

1 min
2.2K

स्पर्श तुझ्या पावलांचा होता

जगणे माझे बदलून गेले

लक्ष्मीच्या रुपाने

सुख माझ्या अंगणी आले


माझ्या कष्टी जीवनाला

तुझ्या हसण्याने पालवी आली

काळजी सारया दुखाची अन

चिंता सारी मिटुनि गेली


तुझ्या रांगण्यात

पाऊले माजी चालत आहेत

तुझ्या प्रत्येक धावण्यात

दिशा माझी वळत आहे


तुझ्या येण्याणे

मला गवसला जीवनाचा अर्थ

माझी कन्या माझी परी

जिच्या शिवाय जिवन हे निरर्थ...


Rate this content
Log in