माझी प्रेरणा
माझी प्रेरणा
1 min
388
माझ्यासाठी तू नेहमीच
आहेस एक प्रेरणा
माझ्या प्रत्येक वर्तनात
तुझीच असते चालना
उठता बसता सदा मला
दिसतो तुझाच चेहरा
तुझ्या आठवणीत मी
प्रयत्न करत असतो जरा
तुझे हसणे तुझे बोलणे
माझ्यासाठी एक शिकवण
तुझी प्रत्येक हालचाल
माझ्यासाठी एक आठवण
आज मी जो आहे ते
फक्त नि फक्त तुझ्याचमुळे
विसरू शकत नाही कधी
माझे जीवन घडले तुझ्याचमुळे
