STORYMIRROR

SUNITA DAHIBHATE

Others

3  

SUNITA DAHIBHATE

Others

माझी पिलू

माझी पिलू

1 min
326

इवलासा देह तिचा,

     विसावला माझ्या कुशीत...।।

तिच्या हळूवार स्पर्शाने, 

     मन झाले हर्षउल्हसित....।।

डोळे वाटे तीचे,

     जणू मोतीच पवळे..।।

अंगाची कांती भासे,

     जणू मऊ लोण्याचे गोळे....।।

इवल्याशा हातांना,

     इवलीशी बोटे.....।।

नजरेआड होताच,

     रडणे सुरू करते खोटे....।।

रडून रडून कधी कधी, 

    नुसताच घालते गोंधळ....।।

घरात सगळयांचीच,

    सुरु होते मग पळापळ.....।।

नजर लागू नये, 

    कुणाची माझ्या पिलूला....।। 

काळा टिका लावते,

    म्हणुनी मी तिला....।।


Rate this content
Log in