माझी मुलगी
माझी मुलगी
1 min
432
बोलक्या या स्वभावातुनी
थकवा माझा पळून जाते
तुला पाहताच क्षणी मी
खेळण्यात रमून जाते
तुझ्या हसऱ्या चेहऱ्यात
विसरून सारे माझे भान
तुझ्या आवाजातून मी
होऊन जाते सारी बेभान
तुझ्या मागे धावायला
मला फारच आवडते
तुझ्यासंगे ओरडायला
ओरडत राहावे वाटते
