माझी मराठी भाषा
माझी मराठी भाषा
माझी मायबोली भाषा मराठी
किती आहे सुलभ सोपी साधी
होतो सहज ज्ञानाचा खुलासा
नाही अवघड समजण्यास कधी
माझ्या मुखातला पहिला शब्द
आई म्हणून मी बोलला
सांगतो अभिमानाने सर्वांना
माय मराठीत तो मी उच्चारला
बाराखडी अ,आ,इ,ई उ,ऊ
माझ्या बुध्दीचा विकास झाला
जिवनाच्या प्रवासाचा मार्ग
माय मराठीतून सुरू झाला
माय बोली भाषा गोड वाचा
जनु जादूई शक्ती माझ्यासाठी
विचारांना माझ्या नव चालना
विवेकाला झाली आधारची काठी
खरी ओळख जगाची मला
पुरेपुर ज्ञान माय मराठीत
झाले शिक्षण अनेक भाषेत
तरि ओळख माझी मराठीत
आहे साक्ष पदोपदी मायभुमीत
ज्ञानी घडले मराठी विद्येतुन
हितगुज मानवतेसाठी आदर्श
मायमराठी मायभूमीचे आहे धन
