STORYMIRROR

Manda Khandare

Others

3  

Manda Khandare

Others

माझी माय मराठी

माझी माय मराठी

1 min
162

माझ्या माय मराठीचे

गाऊ किती गुणगान।

ज्ञानोबा माऊलीने

दिला हिस बहुमान।।


पहाटेच्या परी ओवी

गाई जात्यावरी जनाबाई।

अरे संसार, संसार म्हणती

ज्ञानाचे बोल बहिणाबाई।।


गोडवा माय मराठीचा

जणू साखरेचा पाक।

भक्ति रसातून चालती

जसे अमृतरथाचे चाक ।।


माय बोलीचे उपकार

मनी चे भाव आल्हादी।

अश्रू डोळ्यानं जसा

मायेचा पदर भिजती।।


कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी

होई आनंद साजरा।

राजभाषा दिनाचा

हा सोहळा गोजरा।। 


साहित्याला गुण द्या
लॉग इन