STORYMIRROR

Dipali Lokhande

Others

3  

Dipali Lokhande

Others

माझी लेक

माझी लेक

1 min
549

एकतरी मुलगी असावी

माझे बोट धरुन

पहिले पाऊल टाकणारी

एकतरी मुलगी असावी

माझ्या पोटी येऊन

माझं नाव इथेच

ठेऊन जाण्यासाठी

एकतरी मुलगी असावी

माझ्या कुशीत झोपण्यासाठी

भावांडाशी भांडणारी

एकतरी मुलगी असावी

वाटेत ठेच लागल्यावर

आई फार लागलं

म्हणुन विचारण्यासाठी

एकतरी मुलगी असावी

आजारी पडल्यावर

काळजी घेणारी

एकतरी मुलगी असावी

कळीसारखी फुलणारी

माझ्या दारी.

मुलीला समर्पित माझी कविता


साहित्याला गुण द्या
लॉग इन