माझी लेक (ओवी)
माझी लेक (ओवी)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
552
येई रांगत तान्हुली | लेक माझी सोनुली |
मिठी मारी पिटुकली | हरखली ही आई ||
खेळतीय दुडूदुडू | आवडतो तिला लाडू |
मन तिचे कसे मोडू | गुणी माझी बाई ती ||
साऱ्या घरात लाडकी | नाही मुळीच चिडकी |
चाले तिची ही दुडकी | पोर खट्याळ भारी ||
वाढवीन लाडात मी | शिक्षणाची देई हमी |
पडणार नाही कमी | पालन पोषणात ||
दिसायला परीवाणी | शोभेल राजाची राणी |
उचलून नेई कोणी | वाटेवरचा चोर ||
जेव्हा मला साद घाली | ऊर माझा वर खाली |
तिच्या सुखाची मी वाली | कनवाळू मी माय ||