माझी जन्मभूमी
माझी जन्मभूमी
नांदतो ज्ञानराजा जिथे
ती श्रेष्ठ माझी जन्मभूमी
लाभली धूळ ज्ञानाई माऊलीची
पुण्याई ही संचिताची
जिवा भेट झाली अलंकापुरीची
लावते डोई माती
संत सज्जनांच्या पाउलांची....
पाहते, टेकते माथा
होऊनि जाते माय माऊलीची ....
इंद्रायणी तीरी
भजन कीर्तनाच्या सरी
जाऊ कोणा भेटावया
माता पित्याच्या घरी
की राजा ज्ञानियाच्या दारी
तरणोपाय झाला आता
साहवेना तयावीण परि
माझी श्रेष्ठ जन्मभूमी ...ज्ञानाची कर्मभूमी ...
तिथे आठवे न रडे
तिथे नामसंकीर्तन घडे
परम आनंद सापडे
समाधीवर टेकता बापुडे
काय वर्णू महिमा तेथला
शब्द पडती तोकडे...
