STORYMIRROR

harshada joshi

Others

3  

harshada joshi

Others

माझी जीवनशाळा

माझी जीवनशाळा

1 min
412

श्रेष्ठ दानाने मिळाले मला लक्ष्मीचे वरदान 

ज्ञानदानाचा वसा म्हणू की असे विद्यादान 


चिमुकल्यांकडून मिळाला नेहमीच सन्मान 

प्रेम आदराचे तर भरभरून मिळते वाण


लहान झाल्यासारखं वाटतं त्यांच्या भोवती 

विद्यार्थ्यांचं समाधान हिच आमुची पावती 


शिकवताना घडता नि घडवता आलं मला

शिक्षण एक शास्त्र म्हणू की सहज कला


याच नोकरीतून शिकता येते मनाची भाषा 

नवी पिढी फुलताना पाहून फुलत जाते आशा


शिक्षक भासतो जणू एक कुंभाराचा आवा

त्यांची बोबडी बोली की वाजे कृष्णाचा पावा


शिक्षकाची नोकरी जणू बागेतला थंड प्रवास 

हळूच यशाचा मिसळतो सुखावणारा सुवास 


Rate this content
Log in