माझी भाषा माझा अभिमान
माझी भाषा माझा अभिमान
माझी भाषा सदैव माझा अभिमान आहे
शब्द शब्द भाषेमधला माझा प्राण आहे.
बोलके करावया जीवन धडपडावे लागते
सोबतीला भाषेचे मज एवढे वरदान आहे.
दु:ख माझे मांडू कसा मज समजेना काही
व्यक्त कराया वेदना कुणाचे योगदान आहे.
असेल फार प्राचीन तरी जिर्ण होते न कधी
अजूनही तेवढे माझ्या भाषेमध्ये त्राण आहे.
आमुची भाषांचं आहे आमुची अस्मिता ही
ओठी माझ्या नेहमी भाषेचे गुणगाण आहे
शब्द संपदेचा साठा संपणार नाही कधी
माझी भाषा म्हणजे सोन्याची खाण आहे.
रोज साकारतो आम्ही चित्र अचाट कल्पनेने
भाषा माझी कल्पनेच्या आकाशी यान आहे
वारसा हा लाभलाआम्हा जाहलो धन्य धन्य
जगातही लाभला भाषेस माझ्या मान आहे
